ठळक मुद्देकोरोनापासून संरक्षण कसे कराल यासाठी जनजागृती केली.
नांदूरवैद्य : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातही अनेक ग्रामपंचायतींनी आपापली गावे ही गावातील मुख्य रस्त्यांसह बंद करून ठेवली आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अधरवड येथील शिक्षक भगवंत डोळस यांनी स्वखर्चाने नागरिकांना मास्कचे वाटप केले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टर, अंगणवाडीसेविका, आशासेविका आदींसह गावातील ग्रामस्थांना सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवून एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून मास्कचे वाटप केले व गावात ठिकठिकाणी कोरोनापासून संरक्षण कसे कराल यासाठी जनजागृती केली.