----------------------------------------------
धर्मनाथ बीज महोत्सव उत्साहात
सिन्नर : सालाबादप्रमाणे यावर्षी धर्मनाथ बीज महोत्सव हा नाथपंथी समाज श्री गोरक्षनाथ स्मशानभूमी ट्रस्टच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. दिग्दर्शक घनश्याम येडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्यांना ट्रस्टच्या वतीने नाथभूषण हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुकुंद शिंदे, देविदास लांडगे, शांताराम शेटे आदी उपस्थित होते.
--------------------------------------------
संत रोहिदास, सेवालाल महाराज जयंती
सिन्नर : येथील पंचायत समिती कार्यालयात संत शिरोमणी रोहिदास, संत सेवालाल महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सेवानिवृत तहसीलदार दत्ता वायचळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रावण वाघ, वसंत लोहकरे, संजय आहिरे, भाऊसाहेब शिलावट, महेश साळी आदी उपस्थित होते.
------------------------------------------
ब्राम्हणवाडे-नायगाव रस्त्याची दुरवस्था
सिन्नर : तालुक्यातील ब्राम्हणवाडे ते नायगाव रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने रस्ता दुरूस्तीची मागणी महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन लोहकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. ब्राम्हणवाडे ते नायगाव रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
--------------------------------------
सरपंच पदाच्या निवडीकडे लक्ष
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होऊन महिन्याचा कालवधी झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेचे सरपंचपदाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक गावात आरक्षणाने इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे.
---------------------------------------
पांढुर्ली परिसरात स्ट्रॉबेरी शेती
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिमपट्ट्यात परंपरागत शेतीबरोबरच आधुनिक पध्दतीने स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यात आले आहे. तरूण शेतकरी चेतन दिलीप वाजे या तरूणाने स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. दहा गुंठे शेतीत वाजे यांनी स्ट्रॉबेरीचा धाडसी प्रयोग केला आहे.