नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील गणेश मित्रमंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थआश्रमशाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिंचोलीचे माजी सरपंच एकनाथ झाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मित्रमंडळाच्या वतीने १५० विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी अंगाचा साबण यासह चॉकलेट, बिस्किट, फरसाण आदी खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. राज्यातील विविध भागातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांचे मुले आधारतीर्थ आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. सामाजिक भावनेतून मंडळाने हा उपक्रम राबवला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, माजी सरपंच संजय सानप, पोलीसपाटील मोहन सांगळे, आराध्या झाडे, प्रीती झाडे, श्लोक झाडे, श्रावणी झाडे, लता पिंगळे, शिक्षक प्रतीक बिमदाळेकर आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
‘आधारतीर्थ’मधील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:26 AM