महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हास्तरीय ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार सोहळा सुखदेव कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामण खोसकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबक तालुका गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाठ, पेठ गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता योगेश सोनवणे, नगरसेवक प्रशांत दिवे, राजेंद्र म्हसदे, सुखदेव एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस संजय काळे, कैलास बोढारे, बाबुलाल सोनवणे, सिद्धार्थ सपकाळे, शुभम उंबरहंडे उपस्थित होते. यावेळी डॉ.चोपडे यांचे हृदयविकार व आपण घ्यावयाची काळजी यावर व्याख्यान झाले. बदलत्या जीवनशैलीमुळे आजार बळावतो. तरुण पिढीला आजकाल जास्त प्रमाणामध्ये हृदयाचे आजार पाहावयास मिळतात. कारण आहार, विहार आणि विचार यात बदल झालेले आहेत. हरी, वरी आणि करी, यामुळे जास्तीतजास्त आजार बळावतो, असे डॉ.चोपडा यांनी सांगितले. आमदार खोसकर म्हणाले की, शिक्षक हा आमदार-खासदार घडवतो, सर्व अधिकारी करण्याचे काम हा शिक्षक करत असतो. दुर्गम ठिकाणी शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असतो. शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाला प्रत्येकाने सलाम करावा.
यावेळी रवींद्र पवार, विष्णू पवार, भरत सूर्यवंशी, तानाजी गरुड, प्रतिभा वाटपाडे, रूपाली शिगवण, विद्या पवार, मनीषा यशवंते, अमोल जगताप, किशोर देवरे, कविता बागुल, वैभव शिंदे, सुनील बच्छाव, दिलीप बेंडकुळे, प्रवीण काकडे, रवींद्र अहिरे, चिंतामण चौधरी आदीचा गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. (फोटो ०३ इदिरानगर)