सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतिर्थ टाकेद येथील सर्व अंगणवाडीतील लहान मुलांना,गरोदर माता,स्तनदा माता यांना एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत एक मूठ अभियान उपक्रमांतर्गत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत एक मूठ अभियान अंतर्गत ग्राम बाल विकास केंद्र (होम व्हीसीडीसी) अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सॅम व मॅम बालकांकरिता ग्राम बाल विकास केंद्र (होम व्ही सी डी सी) यासाठी ग्रामपंचायत मधील 18 टक्के निधीतूंन हे पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. या योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सॅम , मॅम एस यु डब्लू बालकाकरीता तसेच गरोदर माता, स्तनदा माता,स्तनदा माता यांना एक मूठ पोषण अभियान अंतर्गत दररोज उकळलेला बटाटा,मूठभर गुळ, शेंगदाणे फुटाणे व नारीयल तेलमठ ,अंडी व केळी आदी पोषण आहार महिला व बाल कल्याण 10 % निधीतून उपलब्ध करून दिले जाते. त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायत यांनी सदर कार्यक्रमासाठी लागणारा निधी प्रति लाभार्थी प्रति महिना 400 रुपये प्रमाणे अंगणवाडी स्तरावर अमृत आहार योजनेच्या खात्यावर वर्ग केला जातो , उल्लेखित पौष्टिक खाद्याना अंगणवाडी स्तरावर पुरवठा करून लाभार्थी यांचे बँक तपशील व सदर लाभार्थ्यांच्या याद्या पर्यवेक्षिका व वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या याद्या अंगणवाडी स्तरावरून प्राप्त करून घ्याव्यात असे आदेश पत्र महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी इगतपुरी यांच्याकडुन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे.
दरम्यान गुरुवारी टाकेद बु ग्रामपंचायत कार्यालयात सर्व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत सर्व लाभार्थी यांना सरपंच ताराबाई बांबळे,उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी या पोषण आहाराचे वाटप केले यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांला गूळ,शेंगदाने,ओला खजूर,खोबरेल तेल,मठ आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच ताराबाई बांबळे,उपसरपंच रामचंद्र परदेशी,सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे,ग्रामपंचायत सदस्य सतिष बांबळे,विक्रम भांगे,केशव बांबळे,नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे डॉ श्रीराम लहामटे,सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे,ग्रामपंचायत कर्मचारी सतीश जाधव,सागर दवंडे, लालमन नांगरे,किशोर पवार आदींसह सर्व अंगणवाडी सेविका व लाभार्थी यावेळी उपस्थित होते.