मालेगाव : लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्ताने सयाजीराव युवा मंच, प्रबोधन फौंडेशन व हृदयसम्राट प्रतिष्ठान यांच्यावतीने कसमादे भूषण पुरस्कारांचे वितरण संगमेश्वर भागातील माळी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.अध्यक्षस्थानी अध्यक्ष अहिराणी संमेलनाध्यक्ष एस. के. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता हास्यजत्राफेम श्याम राजपूत, अभिनेत्री निवेदिता पगार, मामको बँक अध्यक्ष राजेंद्र भोसले, धर्मा भामरे, विजया लक्ष्मी आहेर, नगरसेवक नंदकुमार सावंत, संजय अहिरे, जीवन अहिरे, संतोष शिल्लक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राजपूत यांनी अनेक विनोदी किस्से सांगत हास्य फुलविले.
कलाक्षेत्रातील अनुभव सांगितले. जीवनात अनेक प्रसंग येतात. अशावेळी निराश होऊ नये. कसमादे पट्ट्यातील लोकांना अभिनय क्षेत्रात संधी मिळते आहे हे आशादायी चित्र आहे. अभिनेत्री निवेदिता पगार हिनेदेखील अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास सांगितला. पुरस्कारार्थींच्यावतीने अंकुश मयाचार्य, कमलाकर देसले यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात पाटील यांनी कसमादे भूषण पुरस्कार संयोजन समितीच्या तरुणांचे कौतुक केले. प्रास्ताविक अध्यक्ष तुषार शिल्लक यांनी केले. कार्यक्रमास महेश अहिरे, चैतन्य शेवाळे, अमोल ठोके, समाधान शिंपी, सुरेंद्र दळवी, राहुल मोरे आदींसह नागरिक उपस्थित होते.यांचा झाला सन्मानकमलाकर देसले (साहित्य),शेखर पगार (सामाजिक), मंजूषा पगार (क्रीडा), विशाल गोसावी (पत्रकारिता), दीपक निकम (व्यवसाय), ॲड.हिरामण वाघ (कृषी), माणुसकी फौंडेशन (सामाजिक संस्था) अंकुश मयाचार्य (शिक्षण), शिल्पा देशमुख, पूनम बच्छाव, डॉ.आशालता देवळीकर, डॉ.रजनी घुगे, डॉ.मंदाकिनी दाणी (महिला रत्न), प्रा. प्रज्ञा सावंत (शिक्षण), सागर पवार (राजकीय) या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.