नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे.बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्टÑीयीकृत बॅँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आलेल्या मुख्य दहा बँकांमार्फत आतापर्यंत १ हजार ६१० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. मुख्य दहा बँकांचे पीककर्ज वाटप ६३ टक्के असून, काही बँकांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि तत्परतेने कर्ज वाटप केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्र ६५ टक्के, जिल्हा बॅँकेने सर्वसाधारण कर्जवाटप ३३६ कोटीपर्यंत केले आहे, तर इतर बँकांनीदेखील खूप चांगल्या प्रकारे कर्जवाटप केलेले आहे. अशाप्रकारे जास्त उद्दिष्ट असलेल्या राष्ट्रीयीकृत बँक व ज्यांचे २०० कोटींपेक्षा जास्त उद्दिष्ट आहे अशांनी चांगले काम केल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्हा बँकेला ९१५ कोटी रुपये मिळालेले आहेत.कर्जमुक्ती योजनेत २४५ कोटी वाटपमहात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांचे साधारणपणे १ हजार ७५ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. नवीन कर्ज घेण्याची इच्छा असलेल्या शेतकºयांना आजपर्यंत २४५ कोटीपर्यंत कर्जवाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पावणेदोन हजार कोटींचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 2:08 AM
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे.
ठळक मुद्देखरीप हंगाम : गतवर्षापेक्षा यंदा अधिक वाटप