देवळा : येथे कर्मवीर रामरावजी अहेर यांच्या स्मृतिसप्ताह निमित्ताने कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश संपादनकरणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.अध्यक्षस्थानी सटाणा येथील यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र आहेर, उपाध्यक्ष श्रीमती सुशीलाबाई अहेर, सचिव गंगाधर शिरसाठ, मविप्रचे संचालक डॉ. विश्राम निकम, अॅड. एल. के. निकम, रेणुका निकम, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्षशंकरराव सावंत, उपप्राचार्य आण्णासाहेब पवार, मुख्याध्यापक उषा बच्छाव, मुख्याध्यापक डी.ई. अहेर, राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार, माजी सरपंच जितेंद्र आहेर, डॉ. व्ही. डी. आहेर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पाहुण्यांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक उषा बच्छाव यांनी अहवालवाचन केले. अॅड. एल. के. निकम यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. बी. के. रौंदळ यांनी केले. मुख्याध्यापक डी. ई. आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी रांगोळी प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनास प्रमुख पाहुण्यांनी भेट दिली. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमास सुरु वात झाली. यावेळी जे. टी. बत्तीसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मालती आहेर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
देवळा महाविद्यालयात पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:55 PM
देवळा येथे कर्मवीर रामरावजी अहेर यांच्या स्मृतिसप्ताह निमित्ताने कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
ठळक मुद्देगुणवंतांचा गौरव : कर्मवीर रामरावजी आहेर स्मृतिसप्ताह