ठळक मुद्दे आठवडे बाजारात पत्रकांचे वाटप करण्यात आले.
खामखेडा : मतदानामघ्ये वाढ होण्यासासाठी खामखेडा येथील आठवडे बाजारात पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.दिवसोंदिवस मतदानाची टक्के वारी घसरत असल्याने मतदान कमी कमी होत असल्याने यात वाढ होण्यासाठी मतदारांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. १०० टक्के मतदानाच्या संकल्पला व्यापक राष्ट्रहिताच्या विचारांची जोड हवी. जनतेच्या सहभागातून मतदानातून व्यक्त होतो. मतदानाचा अधिकार हि लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला दिलेली शक्ती आहे. त्यामुळे मतदान विवेकबुद्धीने करणे आपले कर्तव्य आहे.आपणही मतदान करा आणि आपल्या शेजाऱ्यांचेही मतदान करून घ्याव. अश्या आशयाच्या मतदान जनजागृती पत्रकांचे प्रबोधन मंच पुणे यांच्याकडून खामखेडा येथील आठवडे बाजारात वाटप करण्यात आले.