येवला : तालुक्यातील देवळाणे येथे आदिवासी बांधवांना शिधापत्रिका व घरकुल मंजुरीच्या आदेशाचे वाटप समारंभपूर्वक करण्यात आले. ‘सभापती आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पंचायत समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रमोद हिले तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, घरकुल आदेशाचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील प्रत्येक समाजाच्या कुटुंबांला शिधापत्रिका व जातीचे दाखले देण्याचे काम ‘सभापती आपल्या दारी’ या मोहिमेंतर्गत वर्षभरापासून सुरू आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, उपेक्षित व वंचित घटकांना घरपोच लाभही मिळत आहे. गोरख मोरे व रामदास काळे यांनी या उपक्रमाचे व सभापती गायकवाड यांचे कौतुक केले. आगामी काळात आदिवासी विकास भवनकडून आदिवासी पैठणी कारागीर तरूणांना हातमाग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती गायकवाड यांनी सांगितले. देवळाणे येथे आदिवासी तरूण पैठणी वीणकाम व उत्पादनाचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत असल्याचे पाहून मनस्वी आनंद झाला. सर्व कारागिरांनी एकत्र येऊन देवळणे गावाला ‘पैठणी हब’ म्हणून ओळख मिळवून द्यावी, असे आवाहन तहसीलदार हिले यांनी यावेळी केले. सभापती गायकवाड यांच्या कामाचाही हिले यांनी यावेळी गौरव केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू बहिरम यांनी केले तर भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले. यावेळी अशोक काळे, भाऊसाहेब काळे, चांगदेव मोरे, कैलास मोरे, संतोष गोरे, भाऊसाहेब मोरे, नवनाथ गांगुर्डे, दिलीप मोरे, मच्छिंद्र मोरे, तानाजी मोरे, अरुण मोरे, मंगेश मोरे, रंगनाथ मोरे, संदीप मोरे, दीपक मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- १८ येवला देवळाणे
===Photopath===
180321\18nsk_10_18032021_13.jpg
===Caption===
देवळाणे येथे रेशनकाडर् व घरकुल आदेशांच्या वाटपप्रसंगी तहसीलदार हिले. पचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड व लाभार्थी.