लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे स्वस्त धान्य दुकानाद्वारे रेशन वाटप सुरळीतपणे करण्यात आले.सद्या देशात सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातला असून संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असल्याने सर्वत्र लॉग डाऊन करण्यात आले आहे. यात शेतकरी व शेतमजूर वर्गाचे जास्त हाल होत आहेत.मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या घरी चुली पेटणे मुश्किल झाले आहे. सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाले असून जीवनावश्यक वस्तूची दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश शासनाने दिले असून यातही काही ठिकाणी अनियमतिपणा दिसतो आहे.गोरगरीब जनतेसाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणारे रेशन दुकान उघडे करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉगडाऊन, संचार बंदी असल्याने शासनाने घालून दिलेले नियम पाळणे दुकानदार व ग्राहकांनाही बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत विठेवाडी येथे स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर सरळ रेषेत विशिष्ठ अंतरावर गोल करून व दुकानाच्या बाहेर तात्पुरते सुरक्षा कठडे तयार करून शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून रविवार (दि.५) पासून रेशन वाटपास सुरवात झाली आहे.या ठिकाणी रेशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर हातावर दिले जाते, तसेच कोरोनाचा प्रदुभाव वाढू नये म्हणून काळजी घेत रेशन घेण्यासाठी येणारे प्रत्येक ग्राहक हे तोंडाला मास्क व रु माल बांधून येत आहेत. दुकाना समोरील मोकळ्या जागेत आखून दिलेल्या क्र माने सुरक्षित अंतर राखून रेशन वाटप करण्यात येत आहे.
स्वस्त धान्य दुकानाद्वारे विठेवाडी येथे रेशन वाटप सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 4:24 PM
लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे स्वस्त धान्य दुकानाद्वारे रेशन वाटप सुरळीतपणे करण्यात आले.
ठळक मुद्देरेशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर हातावर दिले जाते