सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील उजनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतच्या सदस्य विमल सुरसे यांनी सदरचा उपक्र म राबविला. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असल्याने सुरसे यांनी पुढाकार घेऊन गावातील जिल्हा परिषद शाळेतील १७० विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप केले.
विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:09 AM