दिंडोरी : शासनाच्या कृषी विभागामार्फत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा विक्री केंद्रात होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी खोरीपाडा परिसरातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शेतकºयांना बियाणांचे वाटप करण्यात आले.शेतकºयांना कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करण्यासाठी दिंडोरीतील विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते. सदर आवाहनास प्रतिसाद देत मे. बोरा कृषी सेवा केंद्र, वणीचे संचालक महेंद्र बोरा यांनी खोरीपाडा परिसरातील शेतकºयांना पाच टन खते वाटप करण्यात आले. यावेळी शेतकºयांना सोयाबीनच्या घरच्या बियाणांची उगवणक्षमता कशी तपासायची याबाबत प्रात्यक्षिक तसेच सोयाबीन बियाणांची गावाची गरज गावातच भागविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. झिरवाळ यांनी कृषी विभागाच्या या उपक्र माचे स्वागत केले असून, अनावश्यक गर्दी टाळून बांधावर कृषी निविष्ठा घेण्याचे तसेच सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरायचे आवाहन शेतकºयांना केले आहे. यावेळी खोरीपाड्यातील सम्राट राऊत, हस्तेदुमालातील देवराम राऊत, अहिवंतवाडीचे जयराम गावीत, चौसाळेचे दत्तू पाटील आदी शेतकरी तसेच वणीतील कृषी सेवा केंद्र चालक, कृषी सहायक भदाणे, संदीप बोर्वे, कृषी पर्यवेक्षक संजय सावंत, कृषी अधिकारी डी. सी. साबळे व तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे आदी उपस्थित होते.
खोरीपाडा गावात शेतकऱ्यांच्या बांधावर बियाण्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 9:57 PM