येवला : येथील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या चार वारसदारांना शिलाई मशीनचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते वाटप करण्यात आले.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपत असली तरी सामाजिक जबाबदारीपुर्ण होत नाही. याच सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्वाच्या भावनेतून तालुक्यातील जानेवारी २०१५ पासूनचे शेतकरी आत्महत्या पात्र लाभार्थी कुटूंबाचे विविध मुद्यावर आधारित सर्वेक्षण करण्यात आले. सदर आत्महत्याग्रस्त कुटुंबाना भेट देऊन त्यांची सद्यस्थिती जाणून घेवून त्यांना शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ देता येईल हे निश्चित करून त्यानुसार त्यांना लाभ देण्यासाठी उभारी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे तहसिलदार प्रमोद हिले यांनी सांगितले.उभारी कार्यक्रमांतर्गत शेतकरी कुटुंबाना भेट देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना शासनांच्या विविध योजनांचा लाभ मिळाला अथवा नाही हे जाणून घेणे, लाभ मिळाला नसल्यास त्यांना तो मिळवुन देणे त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी अंगीकारून नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी याबाबत पालकत्व स्वीकारणे असा या योजनेचा उद्देश आहे.महसूल विभागा अंतर्गत आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या नावे असलेली जमिन, प्लॉट, घर व इतर स्थावर मालमत्ता संबधित शेतक-यांच्या वारसांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून कार्यवाही पुर्ण करण्यात आलेली आहे.रेशनकार्ड व अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यात आलेला आहे व सामाजिक अर्थसहाय्ययोजनेचा लाभ देणेत आलेला आहे. तसेच कृषी, पंचायत समिती व इतर विभागाचे लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने येवला तालुक्यात १ जानेवारी २०१५ पासूनचे शेतकरी आत्महत्या वारसदारांची यादी तयार करून विविध योजनेचे लाभ देण्यात येत असल्याचे तहसिलदार हिले यांनी सांगितले.या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी सोपान कासार, पंचायत समिती गटविकास अधिकारी उमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, मोहन शेलार, अरूण थोरात, बाळासाहेब लोखंडे, बाबुलाल कासलीवाल, अल्केश कासलीवाल आदी उपस्थित होते.
येवल्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्यावारसदारांना शिलाई मशिनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 7:39 PM
येवला : येथील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या चार वारसदारांना शिलाई मशीनचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देमाणुसकी फाऊंडेशनचा उपक्रम : लाभार्थी कुटूंबाचे सर्वेक्षण