--------------------------
वावी आरोग्य केंद्रात ६० पैकी ५८ निगेटिव्ह
सिन्नर: तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी वावी व परिसरातील नागरिकांच्या कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यात ६० पैकी ५८ जण निगेटिव्ह निघाले. फक्त दोन जण कोरोनाबाधित आढळून आले. पाथरे खुर्द व पांगरी बुद्रूक येथील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्टमध्ये अत्यल्प प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे.
----------------------
शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरु
सिन्नर: शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामासाठी शेतकरी तयारीला लागला असून मशागतीच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त आहे. खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने शेतकरी मशागतीचे काम करीत आहेत. बी-बियाणांची जुळवाजुळव करीत आहे. शेतामध्ये शेतखत टाकण्याचीही लगबग करीत आहेत.