लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत असले तरी यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५ जूनला शैक्षणिक वर्ष सुरूहोऊनही शाळांपर्यंत पुस्तके पोहोचू शकली नव्हती. ही पुस्तके आता अखेर शाळांपर्यंत पोहोचली आहे.शाळास्तरावरून विद्यार्थ्यांनाही पुस्तकांचे वाटप सुरू झाले आहे. बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून पुस्तक वाटप सुरू केले असले तरी काही शाळांमधील विद्यार्थ्यांना पालक रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडत असल्याने स्वत:च शाळेत जाऊन पुस्तके घ्यावी लागत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना बोलविण्यात आलले नाही, परंतु शासनाकडून ज्या ठिकणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शहरातील केंद्र शाळांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शाळास्तरावरही पुस्तकांचे वितरण पूर्ण केले असून, संबंधित शाळांमधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आणि फिजिकल डिस्टन्सचे पालन करून पुस्तकांचे वाटप सुरू केले आहे. शहरातील शाळांना दोन भांडारांतून पुस्तकांचा पुरवठाशहर परिसरात गायकवाडनगर येथील शाळा क्रमांक ३४ येथील भांडारातून,तर नाशिकरोड व सिडको भागासाठी जेतवननगर येथील शाळा क्रमांक ५५ येथील भांडारातून महापालिकेच्या व खासगी अनुदानित अशा मिळून सुमारे १७२ शाळांना २४ केंद्रांच्या माध्यमातून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:16 PM
नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत असले तरी यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १५ जूनला शैक्षणिक वर्ष सुरूहोऊनही शाळांपर्यंत पुस्तके पोहोचू शकली नव्हती. ही पुस्तके आता अखेर शाळांपर्यंत पोहोचली आहे.
ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सचे पालन : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना