कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, नगराध्यक्षा रोहिणी महाले, नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, रावसाहेब शिंदे, कारभारी पगार, मोहनलाल संचेती आदीं उपस्थित होते.यावेळी तहसीलदार बी ए कापसे यांनी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराची माहिती देऊन महसूल विभागाशी निगिडत प्रश्न सोडविण्यासाठी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती देऊन वर्तमान स्थितीत घडत असलेल्या गुन्हेगारी पाशर््वभूमीवरील घटनांचा उहापोह करु न कायदेविषयक मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून कळवण तालुक्यात नवीबेज, कनाशी, अभोणा, दळवट येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार असून या शिबिरात महसूल विभागाकडून विविध दाखले वाटप, रेशनकार्ड वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था विषयक मार्गदर्शन करण्यात आले व कायद्याविषयक माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली शिवाय कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत लाभार्थीना ट्रॅक्टर, औजारे वाटप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे यांच्या हस्ते या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले.शिबिरास उपनगराध्यक्ष जयेश पगार, माजी नगराध्यक्षा सौ सुनीता पगार, नगरसेवक अतुल पगार, नगरसेविका सौ अनिता जैन, सौ अनुराधा पगार, सौ भाग्यश्री पगार, सौ रंजना पगार,सौ अनिता पगार, रामा पाटील, राजेंद्र पवार, विश्वास पाटील, यांच्यासह कळवण परिसरातील नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन व आभार नायब तहसीलदार डॉ व्यंकटेश गुप्ते यांनी मानले.