नाशिक : म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकावन्न मान्यवरांचा शनिवारी (दि़१३) आदर्श शिक्षक, स्वराज्य भूषण ,समाज भूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला़ मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील राजमाता मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, धावपटू अंजना ठमके, मिस महाराष्ट्र स्वराली देवळीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले़
मान्यवरांच्या हस्ते वर्षा मोरोणे,केशव उगले,कैलास पाटील,जया कासार, सुरेश सलादे,अनिलसिंग परदेशी,दत्तात्रेय वाणी, विलासराव जमधडे,प्रकाश पाटील,सचिन दिवे,सविता मौळे,डॉ.बाळू घुटे,रमेश थविल,भास्कर महाले, नयना घोलप,लक्ष्मीकांत संत,रोहिणी आहेर, ज्ञानेश्वर वायकांडे,संजय पाटील,किसन ठाकरे,रमेश पवार,भरत भोये,शंकर बागुल,मोहिणी भगरे, नविकेत कोळपकर,ज्ञानेश्वर मोहन,प्रशांत भामरे,जयश्री ढोले, त्र्यंबक दिंडे,जगदीश जाधव यांचा आदर्श शिक्षक, प्रकाश वैंशपायन,मोतीराम पगारे,अशोक नागपुरे,रविंद्र सरकार,रविंद्र चव्हाण,निंबा गोसावी, डॉ.राहुल भोसले यांचा स्वराज्य रत्न पुरस्कार तर संगीता चव्हाण, माजी नगरसेवक डॉ. जगन्नाथ तांदळे, माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे, नितीन विखार,विलास चारोस्कर, डॉ. गोपाळ गवारी, नवनाथ हुमन,अॅड.विजय खैरे,शेखर फरताळे,दर्शना साळुंके,आशालता देवळीकर,धनंजय जाधव यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला़
यावेळी व्यासपीठावर स्वराज्य परिवारचे सचिव विनायक सूर्यवंशी, प्रकाश उखाडे, वाल्मिक शिंदे, डॉ. जवाहर बेदमुथा,विनोद बिरारी,जयश्री ढोले उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वराज्य परिवारचे अध्यक्ष भाऊसाहेब नेहरे यांनी केले़ सुत्रसंचालन जयश्री ढोले यांनी तर आभार संगीता चव्हाण यांनी मानले.