सिन्नर : येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या माध्यमिक विभागात राजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.शैक्षणिक क्षेत्रात एस. जी. पब्लिक स्कूल जिल्ह्यात नावाजलेले असून, विविध उपक्रमांमध्ये विद्यालय उल्लेखनीय कामिगरी करत असल्याने सिन्नरला एक वेगळी ओळख मिळाल्याचे प्रतिपादन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले. राजस्व अभियानांर्गत विविध दाखले वाटप कार्यक्र मात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, व्यवस्थापक अभिषेक गडाख, प्राचार्य रघुनाथ एरंडे, नगरसेवक गोविंद लोखंडे, सी. बी. मरकड, रामदास सोनवणे, कैलास केदार, संजय धरम आदी उपस्थित होते.सिन्नर तहसील कार्यालय व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळावी या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आला असून, भविष्यात संस्थेच्या विविध शाखा व तालुक्यातदेखील विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले वितरित केले जातील, असेही तहसीलदार कोताडे म्हणाले.यावेळी तहसीलदार व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी यावेळी बोलताना सांगितले की, दाखले काढताना विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ होते. अनेक चकरा मारून कधी कधी प्रवेशाची मुदत संपते तरी दाखले मिळत नाही. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाचे शाळेतच दाखले वितरित करण्याचा उपक्र म कौतुकास्पद असून, विद्यार्थी व पालकांना याचा चांगला फायदा होईल असे उद्गार यावेळी त्यांनी काढले.माजी आमदार सूर्यभान गडाख यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून त्यांनी रस्ते, पाझर तलाव, औद्योगिक क्षेत्रात क्रांती केली त्याबरोबरच तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा उपलब्ध करून दिली असे मत नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी यावेळी मांडले. विद्यालयाच्या कॅम्पसमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, इतर ठिकाणच्या वतावरणापेक्षा एस. जी. पब्लिक स्कूलची शिस्त वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोद्गार लोखंडे यांनी यावेळी काढले.याप्रसंगी पहिल्या टप्प्यात आठवी ते दहावीच्या ५४० विद्यार्थ्यांना राष्ट्रीयत्व, अधिवास (डोमेसाईल), डोंगरी व उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप केल्याचे प्राचार्य रघुनाथ एरंडे यांनी सांगितले. कार्यक्र मासाठी पर्यवेक्षक माधवराव शिंदे, शिवाजी गाडेकर, अतुल पाटणे, विलास सातपुते, प्रमोद कांबळे, संजीवनी गजभार, राजू कांबळे, सुभाष माळी, शांताराम महाले,अविनाश गुंजाळ आदी उपस्थित होते. प्रवीण सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले. रुपेश कुºहाडे यांनी आभार मानले.
राजस्व अभियानांतर्गत सिन्नरला विविध दाखल्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 6:21 PM