पेठ व सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेले शेपूझरी, खांडोळ, भेनशेत, उंबुरने, खोबळा आदी गावांतील ४०० नागरिकांना मास्क व दहा दिवस पुरेल इतका भाजीपाला प्रत्येक कुटुंबाला वाटप करण्यात आला. यामध्ये वांगे, बटाटे, कांदे, कारले, शिमला, टमाटे, कोबी इत्यादी भाज्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या संस्थापिका शिल्पा शिंदे, श्याम चव्हाण, मनीषा निकुंभ, प्रियंका भंडारे, अरुण सुबर, पोलीसपाटील रामदास वारडे, माजी सरपंच दत्तू निकुळे, कन्हय्या वारडे, वसंत म्हसे आदी उपस्थित होते.
फोटो - ३० पेठ १
शेपूझरी परिसरात आदिवासींना भाजीपाला व मास्क वाटपप्रसंगी सेवा सोशल फाउंडेशनच्या शिल्पा शिंदे, श्याम चव्हाण, मनीषा निकुंभ, प्रियंका भंडारे, अरुण सुबर आदी.
===Photopath===
300521\30nsk_7_30052021_13.jpg
===Caption===
शेपूझरी परिसरात आदिवासींना भाजीपाला व मास्क वाटप प्रसंगी सेवा सोशल फाऊंडेशनच्या शिल्पा शिंदे, शाम चव्हाण, मनिषा निकुंभ, प्रियंका भंडारे, अरुण सुबर आदी.