सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने पोलिसांना चोवीस तास ड्यूटी बजवावी लागत आहे. त्यामुळे येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलिसांना पिण्याचे पाणी व सेफ्टी लिक्विडचे वाटप करण्यात आले.प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील, अर्जुन घोरपडे, संदीप लोंढे, अजय कुलकर्णी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. जगात व देशात थैमान घालत असलेल्या कोरोनापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता उन्हातान्हात उभ्या असलेल्या पोलिसांना वेळेवर पाणी जेवण मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाण्याच्या बाटल्या व सेप्टी लिक्विड घेऊन शिवाजी महाराज चौक, वावी वेस येथे पोलिसांना वाटप करण्यात आले.
सिन्नरला पोलिसांना पाणी बाटल्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 9:10 PM