सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालय, इंडिया बुल्स कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयात शेकडो कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून दहीवाडी व पुतळेवाडी (रामपूर) येथील शेतकरी नितीन धारणकर, विशाल घोटेकर, भाऊसाहेब जगदाळे, बापू पोलगर, शंकर जगदाळे, रामहरी बर्गे, रवींद्र बर्गे, किरण नाठे या शेतकऱ्यांनी रुग्णांना सकस आहार मिळावा, यासाठी फलाहार देण्याचा मानस व्यक्त केला. या शेतकऱ्यांनी पीकअप जीपमध्ये ७० जाळ्या भरून इंडिया बुल्स कोविड सेंटर, सिन्नर ग्रामीण रुग्णालय या शासकीय रुग्णालयासह सिध्दीविनायक, शिवाई व यशवंत या खासगी कोविड सेंटरमधील रुग्णांना पपई व टरबूज (कलिंगड) पोहोच केले.
जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळांचे वाटप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हर्षल देशमुख, पंकज जाधव, गणेश माळी, दर्शन कासट यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो - १७सिन्नर फार्मर
सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दहीवाडी व पुतळेवाडी येथील शेतकऱ्यांनी फलाहार पोहोच केला. त्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह शेतकरी.
===Photopath===
170521\17nsk_25_17052021_13.jpg
===Caption===
फोटो - १७सिन्नर फार्मर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दहीवाडी व पुतळेवाडी येथील शेतकऱ्यांनी फलाहार पोहच केला. त्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह शेतकरी.