ठेवीदारांनी शाखा व्यवस्थापक, दिंडोरी तालुका व्यवस्थापक, प्रधान कार्यालयाचे प्रमुख तसेच दिंडोरी तालुक्यातील संचालक यांच्याशी वारंवार विनंती अर्ज करूनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. अखेर ठेवीदारांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी एकत्र येत खेडगाव शाखेत जाऊन जाब विचारला. प्रधान कार्यालय तसेच येथील बँक व्यवस्थापक, तालुका विभागीय अधिकारी यांनी ठोस उत्तरे न दिल्याने तसेच ठेवीदारांना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची धमकी देण्यात आल्याने ठेवीदार संतापले. ठेवीदारांनी आक्रमक होत सर्व कर्मचारी वर्गाला बाहेर काढत बँकेला कुलूप ठोकले. यावेळी वाद जास्तच विकोपाला जात असल्याचे समजताच बँकेचे संचालक गणपतराव पाटील, खेडगावचे सरपंच दत्तात्रेय पाटील, सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील यांनी बँकेचे कार्यकारी संचालक पिंगळे व सभासद यांच्याशी चर्चा केली. यावेळी पुढील आठवड्यात ठेवीदारांसोबत एक बैठक घेऊन लवकरात लवकर ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर ठेवीदारांनी बँकेचे कुलूप उघडले.
इन्फो
...तर प्रधान कार्यालयाला टाळे!
पुढील पंधरा दिवसांच्या आत ठेवी नाही मिळाल्यास पुन्हा कुलूप लावण्याचे आंदोलन केले जाईल आणि सर्व जिल्हाभरातील ठेवीदारांना एकत्र करून प्रधान कार्यालयालाही कुलूप ठोकले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ठेवीदार राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर डोखळे, महेश पाटील, राष्ट्रमाता इंदिरा गांधी पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण डोखळे, सुनील सोनवणे, सुनील विष्णू सोनवणे, संदीप पवार, रतन बस्ते, नामदेव गवळी, दिलीप बारहाते, सुरेश सोनवणे आदी ठेवीदार उपस्थित होते.
फोटो- १२ खेडगाव बँक
खेडेगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेला कुलूप लावताना ठेवीदार.
120721\12nsk_10_12072021_13.jpg
फोटो- १२ खेडगाव बँक खेडेगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेला कुलूप लावताना ठेवीदार.