नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या महिन्यात सुरू केलेल्या विशेष वसुली मोहिमेंतर्गत कर्जदारांच्या दारापुढे ‘ढोल बजाओ वसुली’ला चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याद्वारे होत असलेली कर्जवसुली पाहून जिल्हा बॅँकेने खरीप पीककर्ज वाटपास आणखी पंधरा दिवस मुदत वाढ देतानाच, कर्जवसुली मोहिमेसही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा बँकेचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले असून, त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या व पात्र शेतकऱ्यांना पुरेशा निधी अभावी कर्जवाटप करण्यात बॅँकेला अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यावर उपाय म्हणून बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी गेल्या महिन्यात बॅँकेच्या अधिकाºयांची बैठक घेऊन वसुलीसाठी कृती आराखडा तयार केला व गत चार ते पाच वर्षांपासून ऐपतदार असलेल्या मोठे टॉप १०० थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून कर्जवसुली करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात प्रामुख्याने फार्म हाउस, पोल्ट्री व्यावसायिक, आजीमाजी सेवक यांचा समावेश आहे. वारंवार नोटिसा बजावूनही कर्ज परतफेड करीत नसल्याने त्यांच्या घरासमोर ढोल बडविण्याचे अभियान राबविण्यात आले. त्यामुळे इभ्रतीपोटी अनेकांनी कर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. कळवण, बागलाण, मालेगाव, दिंडोरीसह विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी थकीत असलेल्या शेतकºयांच्या दारात ढोल वाजवला जात असल्याने या मोहिमेला पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
खरीप पीककर्ज वाटपास जिल्हा बॅँकेची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:15 AM
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या महिन्यात सुरू केलेल्या विशेष वसुली मोहिमेंतर्गत कर्जदारांच्या दारापुढे ‘ढोल बजाओ वसुली’ला चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याद्वारे होत असलेली कर्जवसुली पाहून जिल्हा बॅँकेने खरीप पीककर्ज वाटपास आणखी पंधरा दिवस मुदत वाढ देतानाच, कर्जवसुली मोहिमेसही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देकर्जवसुलीला प्रतिसाद : १६५ कोटी रुपयांचे वाटप