नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सक्तीच्या वसुलीवरून राजकारण तप्त झालेले असताना बॅँकेने आता भाजपचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या ताब्यात असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यालाही वसुलीची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर व आमदार अहेर हे दोघेही चुलत बंधू आहेत.आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅँकेने थकीत वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलावाचा धडका लावला आहे. बॅँकेच्या या सक्तीच्या वसुलीस शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष, संघटनांनी विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही जिल्हा बॅँकेने शेतकºयांकडून वसुली करू नये, अशी मागणी केली. त्यावरून जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आहेर व छगन भुजबळ यांच्यात कलगीतुरा रंगला असताना अध्यक्ष आहेर यांनी थकबाकीदार असलेल्या वसाकाला नोटीस बजावली आहे. वसाकाकडे जिल्हा बॅँकेचे ६ कोटी ७८ लाख रुपये थकले असून, दोन वेळा नोटिसा बजावूनही कारखान्याने प्रतिसाद न दिल्याने गेल्या आठवड्यात तिसरी नोटीस बजाविण्यात आली. या नोटिसींमध्ये थकबाकी न भरल्यास थेट जप्तीची कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी जिल्हा बॅँँकेने शासनाच्या हमीपत्रावर वसाकाला कर्जपुरवठा केला होता. परंतु त्याचा भरणा न केल्याने जिल्हा बॅँकेने वसाकाला नोटीस पाठवित दणका दिला आहे.
जिल्हा बॅँकेची ‘वसाका’लाही नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:17 AM
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सक्तीच्या वसुलीवरून राजकारण तप्त झालेले असताना बॅँकेने आता भाजपचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या ताब्यात असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यालाही वसुलीची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर व आमदार अहेर हे दोघेही चुलत बंधू आहेत.
ठळक मुद्देजिल्हा बॅँकेने वसाकाला नोटीस पाठवित दणका दिला