सायखेडा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ हजार रुपये शासकीय मदत जाहीर केली होती. नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांनी रीतसर अर्ज दाखल करून या रकमेचा शासनाकडून लाभ घेतला असला तरी जिल्हा बँकेने शासनाकडून आलेली रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात परस्पर वर्ग केल्याने शेतकºयांमध्ये नाराजी पसरली आहे.सरकारने शेतकरी कर्जमाफी करताना अनेक नवनवीन फंडे वापरले आहे. कर्जमाफी चुकीच्या पद्धतीने न करता खºया कर्जबाजारी असलेल्या शेतकºयाला मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने सरकारकडून पारदर्शक कर्जमाफी करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्ष मात्र या योजनेचा लाभ शेतकºयांना जाचक अटींमुळे घेता आला नाही. अनेक शेतकरी कर्ज नियमित फेडत असतात. त्यांच्यात कर्ज फेडण्याची मानसिकता कायम राहील यासाठी प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये इतके अनुदान देण्यात आले. सदर योजनेच्या लाभार्थींच्या याद्या संबंधित जिल्हा बँक, सहकारी सोसायटी यांना प्राप्त झाल्या आहेत. योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी यांचे पैसे जिल्हा बँकेला प्राप्त झाले आहे; मात्र जिल्हा बँक सदर पैसे लाभार्थी शेतकºयांना न देता त्यांच्या कर्ज खात्यात परस्पर जमा करत आहे. या योजनेतील लाभार्थी शेतकरी अद्याप थकीत नाही शिवाय शासनाने प्रोत्साहन म्हणून रक्कम दिली आहे, त्यामुळे सदर रक्कम शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याने रोख स्वरूपात द्यावी कोणत्याही कर्ज खात्यात वर्ग करू नये, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांना हवा दिलासाजिल्हा बँक परस्पर रक्कम वर्ग करत असेल तर कर्जमाफीचा कोणताही फायदा शेतकºयांना प्रत्यक्ष होणार नाही. शासनाच्या पैशाचा लाभ हा जिल्हा बँकेला होणार आहे. बँक थकीत कर्ज नसताना परस्पर कर्ज भरून घेत आहे, त्यामुळे तातडीने कर्ज प्रत्यक्ष शेतकºयांना दिलासा म्हणून देण्यात यावे अन्यथा कर्जमाफी फसवी आणि बँकेच्या हिताची असल्याची चर्चा सुरू आहे.
जिल्हा बँकेचा प्रताप : शेतकरी संतप्त; शासनाच्या मुख्य उद्देशाला केराची टोपली प्रोत्साहन कर्जमाफीची रक्कम कर्जात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:07 AM