नाशिक : आर्थिक वर्षाअखेर जिल्हा बॅँकेने हाती घेतलेली कर्ज वसुली मोहीम काहीशी थंडावली असल्याचे वाटत असतानाच बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सोमवारी बॅँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा थकीत कर्ज वसुलीसाठी मोहीम हाती घेण्याची सूचना केली असून, त्यासाठी ‘टॉप २०’ थकबाकीदारांच्या याद्या तयार करण्याचे व त्यांना तगादा लावण्याचे ठरविण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीची टक्केवारी पाहता मार्च २०१८ मध्ये आवश्यक ते कर्ज वसुलीचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही व ते साध्य करण्यासाठी शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे मुद्दल व व्याजासह दीड लाखावरील थकीत कर्ज आहे व ज्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली आहेत अशा शेतकºयांनी दीड लाखावरील त्याच्या हिश्श्याच्या रकमेचा भरणा केल्यानंतर शासनाकडून ‘एक वेळ समझोता योजने’अंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्णातील २१७०० खातेदारांपैकी फक्त ११००० खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. प्रत्येक विविध कार्यकारी व आदिवासी संस्थेमधील टॉप २० थकबाकीदार सभासदांच्या फोन नंबरसह तयार याद्यांनुसार प्रथम त्यांचेकडे कर्ज वसुलीस प्राधान्य द्यावे. तसेच शासनाने नव्याने जाहीर केलेल्या २००१ ते २००९ या कालावधीत कर्ज घेतले व ते आजही थकबाकीदार आहेत ते कर्जमाफीच्या निकषात पात्र होत असतील अशा शेतकरी सभासदांनी आॅनलाइन अर्ज भरावेत व त्यांना बँकेच्या कर्मचाºयांनी मदत करावी. तसेच याबाबत केलेल्या कामाच्या नोंदी प्रत्येकाने स्वतंत्र ठेवून त्याचा अहवाल मुख्य कार्यालयास पाठवावा, असे आवाहनही अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे.
कर्ज वसुलीसाठी जिल्हा बॅँक सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:16 AM