विल्होळी : येथे ग्राम स्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत सांगण्यात आले असून, नागरिकांना, विक्रेत्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडी टाकावा, असे सांगण्यात आले. ग्रामस्थांचे अभिप्राय नोंदणी सुरू झालेली असून, त्यावर जिल्ह्याचे गुणांकन ठरणार असल्याने ग्रामस्वच्छता फेरीचे आयोजन करून फेरी काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळा विल्होळी विद्यार्थ्यांनी अनेक घोषणा दिल्या. यावेळी सरपंच बाजीराव गायकवाड, सोमनाथ भावनाथ, ताराबाई वाघ, संपत बोंबले, संजय गायकवाड, नवनाथ गाडेकर, संतोष आल्हाट, जानकाबाई चव्हाण, रेवूबाई आचारी, मोतीराम भावनाथ, मनोहर भावनाथ, मुख्याध्यापक रवींद्र भदाणे, शिक्षिका आशा सोनवणे, शीतल शिंदे, पूनम बच्छाव, संगीता नागपुरे आदी उपस्थित होते.तपोवनात स्वच्छता मोहीमपंचवटी : तपोवन येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत कपिला संगम या पर्यटन स्थळावर महापालिका पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान तपोवन घाट व कपिला संगम परिसरात स्वच्छता करण्यात आली. परिसरातील सर्व व्यावसायिक दुकानदार यांच्या उपस्थितीत परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच यापुढेही परिसर स्वच्छ ठेवणार, अशी शपथ घेण्यात आली. नागरिकांनी प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळावा, कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. सदर मोहिमेत संजय दराडे, दीपक चव्हाण, ताराचंद काळे, भास्कर पगारे, राकेश साबळे आदी उपस्थित होते.
विल्होळीत स्वच्छता अभियान जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:41 AM