नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल (दि. १८) सिंहस्थ पर्वणीच्या अखेरच्या तिसऱ्या शाहीस्नानाच्या आणि ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासूनच जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. पहाटे सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणांत पाणीसाठा वाढल्याचे चित्र होते.काल सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्णात सरासरी ४७ (७१०.९) मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय नोेंदविण्यात आलेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक- ४६.३, इगतपुरी-५७, दिंडोरी-४५, पेठ-१२.२, त्र्यंबकेश्वर- २६, मालेगाव-९६, नांदगाव-५२, चांदवड-२८.६, कळवण-७७.७, बागलाण-२०, सुरगाणा- २४.४, देवळा- ४६७.२, निफाड- ५६.४, सिन्नर-८८, येवला-३८९ असा एकुण- ७१०. ९ (सरासरी ४७ टक्के ) नोंदविण्यात आला. या पावसामुळे रब्बी हंगामाला फायदा होणार असून, जिल्ह्यातील अत्यल्प असलेल्या धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ होणार आहे. काल पहाटे ३ वाजेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारी ३ पर्यंत कायम होता. तीन वाजेनंतर जोर थोडा कमी झाला तरी पावसाची संततधार मात्र कायम होती. या कालच्या पावसामुळे पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना त्याचा फायदा होणार असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)इन्फो..जोर दोन दिवसकाल पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम होता. हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा असाच जोर शनिवारी (दि.१९) व रविवारी (२०) कायम राहणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. पावसाचा जोर असाच तीन दिवस कायम राहिल्यास जिल्ह्णातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. खरिपासाठी या पावसाचा फारसा फायदा होणार नसला तरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास त्यामुळे खूप मदत होणार आहे.
जिल्ह्यात कोसळधार
By admin | Published: September 18, 2015 11:02 PM