त्र्यंबकेश्वर : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी विविध विकासकामे मुदतीत होणे अपेक्षित असताना ती संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी घाटांच्या कामाची पाहणी केली. कचरा डेपोनजीकच्या घाटाचे काम मागे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी त्यांनी विविध कामांची माहिती घेतली. २६ कामगार कामावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असता त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा या ठिकाणी २६ कामगार नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी अधिकाऱ्यांना २५ जूनच्या आत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गावात सुरू असलेल्या विविध रस्ता कामांची तसेच लक्ष्मीनगरातील कामांचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी महेश पाटील, प्रांत बाळासाहेब वाकचौरे आदिंसह अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची तंबी
By admin | Published: June 02, 2015 11:58 PM