लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि.०७) प्रारंभ झालेल्या लॅबमध्ये दिवसभरात सध्या १८० नमुने तपासण्याची क्षमता आहे. ती आवश्यकतेनुसार ३०० नमुन्यांच्या तपासणीपर्यंत वाढवता येईल, अशा प्रकारची यंत्रणा आहे. त्यामुळे संशयितांचे दिवसभरात तीनशे नमुने नाशकातच तपासले गेल्यास दररोज हजारावर अहवालांची संख्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होऊ शकणार आहे.नाशिकमध्ये मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून संशयितांचे सर्व नमुने हे कुठे पाठवायचे त्याबाबत अनिश्चितता होती. कोरोनाच्या प्रादुर्भावास प्रारंभ झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व अहवाल पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात येत होते. मात्र, संशयित वाढू लागल्यानंतर नाशिकच्या मविप्र रुग्णालयात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्वतंत्र लॅब उभारण्यात आली. नवीन निकषानुसार नाशिक ग्रामीणचे अहवाल मविप्रच्या लॅबमध्ये, मालेगावचे नमुने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात, तर नाशिक महानगरातील आणि जिल्हा रुग्णालयाचे नमुने पुण्याला पाठविण्यात येत होते.पुण्याच्या लॅबवरदेखील अहवाल संख्येचा प्रचंड दबाव पडू लागल्याने तिथेदेखील एनआयव्हीनंतर बीजे मेडिकल लॅब आणि त्यानंतर आर्म्ड फोर्सेस कॉलेजच्या लॅबवर हे अहवाल पाठविले जाऊ लागले. तरीदेखील नाशिक महानगरातील संशयित रुग्णांच्या प्रचंड वाढत्या संख्येमुळे अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण सातत्याने वाढले.सर्व यंत्रणेला प्रशिक्षण जिल्हा रुग्णालयात सुरू होत असलेल्या या लॅबमधून दिला जाणारा नमुन्यांचा अहवाल अचूक असावा, यासाठी जिल्हा रुग्णालयातील तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची निवड करुन त्यांना पुण्याला पाठवून प्रशिक्षण देण्यातआला. त्यामुळे अहवालांची ही सर्व यंत्रणा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच राबविली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या कोरोना लॅबची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली होती. गत दोन महिन्यांपासूनच सर्व यंत्रणा कामला लागल्याने गती निर्माण झाली.अत्यावश्यक मशिनरी, लॅब सेटअप, फर्निचर, इलेक्ट्रिकल फिटिंग्ज अशा किरकोळ कामांच्या निमित्ताने प्रत्यक्ष लॅब साकारण्याला काही काळ विलंब नक्कीच होत होता.जूनच्या अखेरपर्यंत सुरू होणे अपेक्षित असलेली लॅब प्रत्यक्ष प्रारंभ होण्यास आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला.
जिल्हा शासकीय रुग्णालय : लॅबमुळे कामकाजाला येणार गतीप्रलंबित अहवालांची संख्या घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:04 PM
नाशिक : जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि.०७) प्रारंभ झालेल्या लॅबमध्ये दिवसभरात सध्या १८० नमुने तपासण्याची क्षमता आहे. ती आवश्यकतेनुसार ३०० नमुन्यांच्या तपासणीपर्यंत वाढवता येईल, अशा प्रकारची यंत्रणा आहे. त्यामुळे संशयितांचे दिवसभरात तीनशे नमुने नाशकातच तपासले गेल्यास दररोज हजारावर अहवालांची संख्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होऊ शकणार आहे.
ठळक मुद्देलॅब साकारण्याला काही काळ विलंब नक्कीच होत होता.