लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलवामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर आरटीई प्रवेशप्रक्रियेतील सोडत जाहीर होऊनही कागदपत्रांची पडताळणी व प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया तब्बल तीन महिने लांबणीवर पडली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत आॅनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची १७ व १८ मार्चला पुणे येथे संगणकीयप्रणालीद्वारे जिल्हानिहाय सोडत काढण्यात आली. या सोडतीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील ४४७ शाळांमधील ५ हजार ५५७ जागांवर प्रवेशासाठी ५ हजार ३०७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रतीक्षा यादीची प्रक्रियाही याच पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे.तसेच प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पुढील प्रक्रियेसंदर्भात राज्यात कोरोनाचा फैलाव होत असल्याने यापूर्वी ३१ मार्चपर्यंत लांबलेली कागदपत्र पडताळणी व प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया १४ एप्रिलपर्यंत लांबली होती. परंतु त्यानंतरही परिस्थिती सुधारणा न झाल्याने राज्यात जवळपास तीन महिने लॉक डाऊन सुरूच राहिल्याने ही प्रवेशप्रक्रियाही तब्बल तीन महिने लांबली आहे.
जिल्ह्यात तीन महिन्यांपासून ‘आरटीई’ प्रवेशाची अद्यापही प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:13 PM
नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलवामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.
ठळक मुद्देप्रक्रिया रखडली : ४४७ शाळांमध्ये पाच हजार ५५७ जागा राखीव