लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव शहर व तालुक्यासह इगतपुरी तालुक्यात शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने तीन जणांचे बळी घेतले आहे.शनिवारी वादळीवारा, वीजांच्या कडकडाट, गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. पहिल्या पावसातच मालेगाव तालुक्यात वीज कोसळून दोन जण दगावले तर एका महिला जखमी झाली. टोकडे येथे समाधान बहाद्दुरसिंग सुमराव (३०), सुनंदा दिनकर गायकवाड (३२) रा. गरबड या दोघांच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर गरबड येथील सावित्री योगेश माळी जखमी झाल्या आहेत. प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे पितळ पहिल्याच पावसात उघड झाले. तालुक्यात एकाच दिवसात पंचेचाळीस मिलीमिटर पाऊस झाल्याची नोंद झाली. (सविस्तर आतील पान)इगतपुरीत युवकाचा मृत्यूपाऊस सुरू असताना लघुशंकेसाठी जाणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़३) दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील रायगडनगरमध्ये घडली़ मयत युवकाचे नाव विठू कमळू उघडे (२५, रा़ खेडभैरव, देवाची वाडी, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) असे आहे़
जिल्ह्यात पावसाचे तीन बळी
By admin | Published: June 04, 2017 3:02 AM