नाशिक : मुळचा चंद्रपूर येथील रहिवाशी असलेला एक २७ वर्षीय विद्यार्थी हा इटलीत शिक्षणासाठी गेलेला होता. तेथून तो थेट मुंबईमार्गे गुरूवारी (दि.२७) नाशिकला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आला होता. त्याला शनिवारी (दि.२९) सर्दी, थकव्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यास जिल्हा रूग्णालयातील करोनो विषाणू विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत शनिवारी पाठविण्यात आले. त्या नमुन्यांचा तपासणी अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.सदर रुग्णास खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा रु ग्णालयांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले होते. अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने त्याला आता ‘डिस्चार्ज’ देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे. कोरोना विषाणूबद्दल संनियंत्रण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, व जिल्हा रु ग्णालयातील चमूसह महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे पथक सतर्क असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. नाशिककरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, घाबरून जावू नये, सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, थकवा यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच कोरोना विषाणूचा फैला ज्या देशांमध्ये आहे, अशा देशांमधून प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, त्यांना आरोग्याच्या वरीलपैकी काही तक्रारी जाणवल्यास थेट जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधून उपचार घेण्याचा सल्लाही मांढरे यांनी दिला आहे.
जिल्हा रूग्णालय : करोनाचा संशयित रूग्ण निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 8:22 PM
सदर रुग्णास खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा रु ग्णालयांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले होते.
ठळक मुद्देआरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये नमुन्यांचा तपासणी अहवाल मात्र निगेटिव्ह