नाशिक : राज्य शासनाच्या ‘कायाकल्प’ योजनेमध्ये नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची घोषणा शासनाचे आरोग्य आयुक्त डॉ. व्यास यांनी बुधवारी (दि़ २१) केली़ राज्यातील सर्व रुग्णालयांना मागे टाकून जिल्हा रुग्णालयाने हा पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला असून, लवकरच त्याचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे़ या स्पर्धेत जिल्हा रुगणालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरच्या जिल्हा रुग्णालयाचे मोठे आव्हान होते. राज्य शासनाच्या कायाकल्प स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पुण्यातील औंध शासकीय रुग्णालयाने, तर उत्तेजनार्थ म्हणून तिसऱ्या स्थानी वर्धा, चौथ्या क्रमांकांवर नंदुरबार तर पाचव्या स्थानी नागपूरच्या महिला शासकीय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे़ येत्या महिन्याभरात प्रथम क्रमांकाचे ५० लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
‘कायाकल्प’ योजनेत जिल्हा रुग्णालय प्रथम
By admin | Published: December 22, 2016 12:31 AM