नाशिक : महाराष्ट्र परिचर्या परिषदेने परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा परिक्षेचा निकाल जाहीर केला असून यामध्ये जिल्हा रुग्णालयातील परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून ऋतुजा सुरेश घुसळे या विद्यार्थीनीने वैद्य शल्य परिचर्या - २ या विषयात १०० पैकी ९४ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे़ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़सुरेश जगदाळे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़
जिल्हा रुग्णालयातील परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयात जनरल नर्सिंग मिडवायफरी (तीन वर्षे) व आॅक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी (दोन वर्षे) असे शिक्षण दिले जाते़ या विद्यार्थीनींची जुलै २०१८ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती़ त्यामध्ये तृतीय वर्षाचा निकाल शंभर टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल ८९़४७ टक्के लागला़ आॅक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून महाविद्यालयाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे़
जिल्हा रुग्णालयातील या यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही़डी़पाटील, अधिसेविका मानिनी देशमुख, प्राचार्य राजन इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थीजी़एऩएम (द्वितीय वर्षे) :- ऋतुजा घुसळे (प्रथम), गायत्री सोमासे (द्वितीय), अनिल भोये (तृतीय), जी़एऩएम (तृतीय वर्ष) :- नयना हरीणखेडे (प्रथम), किरण पाटील (द्वितीय), प्रियंका चव्हाण (तृतीय), ए़एऩएम (द्वितीय वर्ष) :- ज्योती मिंदे (प्रथम), रेखा रूपवते (द्वितीय), वैशाली अहिरे (तृतीय)