खामखेडा : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा जि. प. शाळा खामखेडा येथे पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.स्पर्धेत केंद्रातील १७ प्राथमिक शाळेतील १३० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला. केंद्रस्तरीय स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे : लहान गट वक्तृत्व स्पर्धा : प्रथम - प्रांजल शेवाळे (खामखेडा), हर्षाली आहेर (हनुमाननगर), चित्रकला स्पर्धा : ईश्वर जाधव (सावकी), रु पाली माळी (निकमवाडी), वैयक्तिक गायन : प्रज्वल शेवाळे (थळवस्ती), कार्तिकी आहेर (हनुमाननगर), वैयक्तिक नृत्य : वैष्णवी शिवले (हनुमाननगर ), प्रज्वल शेवाळे (खामखेडा), धावणे मुले : कार्तिक शेवाळे (खामखेडा), ज्ञानेश्वर सावंत (हनुमाननगर), धावणे मुली : कार्तिकी आहेर (हनुमाननगर), धनश्री पवार (भऊर पश्चिम), समूहनृत्य : जि. प. प्राथमिक शाळा, हनुमाननगर, जि. प. शाळा खामखेडा, समूहगायन : जि. प. शाळा हनुमानगर, जि. प. प्रा. शाळा खामखेडामोठ्या गटात वक्तृत्व स्पर्धा : प्रथम मुले - प्रज्ञा जगताप (सावकी), चित्रकला स्पर्धा : प्रेम सोनवणे (सावकी), वैयक्तिक गायन : सुशांत आहिरे (सावकी), वैयक्तिक नृत्य : समाधान गायकवाड (सावकी), धावणे मुली : वृषाली पवार (सावकी), धावणे मुले : आकाश गोधडे (सावकी), समूहनृत्य व समुहगायन : जि. प. प्राथमिक शाळा, सावकी यशस्वी झाले.बीटस्तरावर ह्या शाळांची निवड करण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरीत करण्यात आलीे. यावेळी बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता. स्पर्धा यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षिका, पालक यांनी प्रयत्न केले.(फोटो ०७ खामखेडा)खामखेडा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धाचे उद््घाटन करतांना पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख, उपसरपंच बापू शेवाळे, सदस्य संजय मोरे, केंद्रप्रमुख शिरीष पवार, मुख्याध्यापिका सुलोचना भामरे व सर्व शाळेतील शिक्षक.
खामखेडा येथे जि. प. चषक स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 5:09 PM
खामखेडा : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा जि. प. शाळा खामखेडा येथे पंचायत समिती सदस्य कल्पना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.
ठळक मुद्देयशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे