शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

जिल्हास्तरीय समितीकडून ग्रामपंचायतींवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:18 AM

नाशिक : तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतींची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येत असून, या पाहणीदरम्यान अनेक बाबी समोर आल्या आहेत.

ठळक मुद्देराजदेरवाडीची पाहणी कामकाजाची प्रत्यक्ष गिते यांच्याकडून पाहणी

नाशिक : तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतींची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येत असून, या पाहणीदरम्यान अनेक बाबी समोर आल्या आहेत.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत बुधवारी चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हास्तरीय तपासणी केली. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात येत असून, यातून तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी राजदेरवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी डॉ. गिते यांनी शाळा, अंगणवाडी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय यांची पाहणी केली. अंगणवाडीत एकही कुपोषित बालक नसल्याबाबत डॉ. गिते यांनी अंगणवाडी सेविकेचा सत्कार केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह तसेच विद्यार्थ्यांसाठीचे स्वच्छतागृह वापरात नसल्याचे निदर्शनास आल्याने गिते यांनी स्वत: शोषखड्डा उघडा करून पाहणी केली.यावेळी त्यांनी प्राथमिक शाळेतील डिजिटल शिक्षणाबाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय पोषण आहाराचा वर्ग उघडून सर्व साहित्याची पाहणी केली. यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बिस्किटे देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. गिते यांनी याबाबत तत्काळ चौकशी करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले.राजदेरवाडी ग्रामपंचायतीच्या संगणक कक्षास भेट देऊन ई-ग्रामबाबत माहिती घेतली. मात्र तांत्रिक कारणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सदरची प्रणाली बंद असल्याचे संगणक परिचालकाने सांगितले. मात्र, सदरची बाब अतिशय गंभीर असून, याबाबत चौकशी करण्याचे व संगणक परिचालकाचे मानधन थांबविण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी गटविकास अधिकाºयांना दिले. यावेळी घरकुल बांधलेल्या लाभार्थींच्या घरी भेट देऊन घरकुलाची व शौचालयाची पाहणी डॉ. गिते यांनी केली.यावेळी चांदवड तालुक्याचे गटविकास अधिकारी हिरामण मानकर, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा व तालुका पाणी व स्वच्छता कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.