निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. रानडे स्मृतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले, वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, वाचनालयाचे हिशोब तपासणीस दत्ता उगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत चिटणीस बाळासाहेब कापसे यांनी, तर प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी व आभार सहचिटणीस तनवीर राजे यांनी मानले.याप्रसंगी शिवाजी ढेपले यांचे भाषण झाले. या स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन अशा दोन गटात घेण्यातआल्या.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून एम. व्ही. जाधव, तानाजी दराडे, ज्योती सांगळे यांनी काम पाहिले. वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक दिलीप कापसे, रावसाहेब माळोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पारितोषिक, गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यातआले.वक्तृत्व स्पर्धेचा निकालइयत्ता पाचवी ते सातवी गट : प्रथम कु. लावण्या नीलेश शिंदे (वैनतेय विद्यालय, निफाड); द्वितीय : कु. शिफा अन्सार पठाण (नूतन विद्यालय, खडकमाळेगाव), तृतीय : अभिषेक जनार्दन आहेर (स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव, ता. येवला); उत्तेजनार्थ कु. सिद्धी सुकदेव आगळे (योगेश्वर विद्यालय, दावचवाडी).४इयत्ता आठवी ते दहावी गट : प्रथम- कु. प्राची शंकर रायते (वैनतेय विद्यालय, निफाड); द्वितीय : कु. नेहरीन रशीद पठाण (वैनतेय विद्यालय, निफाड); तृतीय : कु. गायत्री राधाकृष्ण पारखे (श्री डी. आर. भोसले विद्यालय, देवगाव); उत्तेजनार्थ : कु अनुष्का सुदाम रंधे (स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव).
निफाड येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:58 PM
श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. रानडे स्मृतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले, वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, वाचनालयाचे हिशोब तपासणीस दत्ता उगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देमाणकेश्वर वाचनालय : वैनतेय विद्यालयाची लावण्या शिंदे प्रथम