पिंपळगाव बसवंत : संघटना बांधणीसह साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुन्हा सुरू करावे, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, मातंग समाजाची ( अ,ब,क,ड ) वर्गवारी करून जातीचे आरक्षण द्यावे, मातंग समाजावर महाराष्टÑात अन्याय अत्याचार घडतात ,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआंदोलन उभारले जाणार असल्याचे मत बहुजन रयत परिषदचे महाराष्टÑ राज्य उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव यांनी मांडले. नाशिक जिल्ह्यातील बहुजन रयत परिषदेची सर्वसाधारण बैठक पिंपळगावी राज्य कार्यकारिणीचे सदस्य साहेबराव शुंगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष संजय शिरसाठ, दत्तात्रेय काळोख, रामदास पानपाटील, केदू शिरसाठ आदी प्रमुखांची उपस्थितीत होती. यावेळी बहुजन रयत परिषदेचे अंबादास जाधव, योगेश छारराव, महेश बत्तीशे, योगेश बत्तीशे, गजानन पगारे, दिलीप खरात, सुखदेव पगारे, दादा बकुरे, राजू थोरात, सुभाष बकुरे, किशोर साळवे, मनीष भालेराव, राहुल वाघमारे उपस्थित होते. आभार केदु शिरसाठ यांनी मानले.
पिंपळगावी बहुजन परिषदची जिल्हा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 7:00 PM
पिंपळगाव बसवंत : संघटना बांधणीसह साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुन्हा सुरू करावे, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, मातंग समाजाची ( अ,ब,क,ड ) वर्गवारी करून जातीचे आरक्षण द्यावे, मातंग समाजावर महाराष्टÑात अन्याय अत्याचार घडतात ,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआंदोलन उभारले जाणार असल्याचे मत बहुजन रयत परिषदचे महाराष्टÑ राज्य उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव यांनी मांडले.
ठळक मुद्देशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआंदोलन