नाशिक : शहरासह जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ वाजेर्पंत एकूण १५.९४ टक्के मतदान झाले. शहरात सकाळपासून जरी मतदानाचा टक्का कमी असला तरी दुपारी पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदार बाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे; मात्र ग्रामीण जनता सकाळपासूनच मतदानासाठी घराबाहेर पडल्याने ग्रामिण भागातील केंद्रांवर मतदारांचा उत्साह अधिकच पहावयास मिळाला.नाशिक पुर्व मतदारसंघात एकूण १लाख ८५ हजार १४६ पुरूष तर १लाख ७० हजार ३८ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण १२.७३ टक्के मतदान झाले.नाशिक मध्य मतदारसंघात १लाख ६४ हजार २९१ इतके पुरूष तर १लाख८३ हजार ८६६ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झाले.नाशिक पश्चिम मतदारसंघात २ लाख १७ हजार ७११ इतके पुरूष तर १ लाख ८३ हजार ८६६ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत ११.६० टक्के मतदान झाले.देवळाली मतदारसंघात १ लाख ३८ हजार २५७ पुरूष तर १ लाख २५ हजार ८५० महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत ११.०८ टक्के मतदान झाले.जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघात १०.२३ टक्के तर मालेगाव मध्य मतदारसंघात २१.०६ तर मालेगाव बाह्य मतदारसंघात १५.२७ टक्के मतदान झाले.बागलाण १७.१९ टक्केकळवण २५.८७चांदवड १७.३०येवला १४.७०सिन्नर १७.०९निफाड - १७.०२दिंडोरी - २५.०२इगतपुरी - १५.९५
जिल्ह्यात अद्याप १५.९४ टक्के मतदान; मतदानाची टक्केवारी दृष्टिक्षेपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 1:43 PM
Maharastra Election 2019 नाशिक मध्य मतदारसंघात १ लाख ६४ हजार २९१ इतके पुरूष तर १लाख८३ हजार ८६६ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झाले.
ठळक मुद्देनाशिक पुर्व मतदारसंघात अकरा वाजेपर्यंत एकूण १२.७३ टक्के मतदान मालेगाव मध्य मतदारसंघात २१.०६