नाशिक : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ११ इतर जिल्हामार्ग आणि एक ग्रामीण मार्ग यांना प्रमुख जिल्हामार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्हा परिषदेने ठराव करून सदर रस्ते दर्जोन्नत करण्याची मागणी केलेली होती. शासनाच्या या निर्णयामुळे या रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ, दुतर्फा येणाऱ्या गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यांचा होणारा वापर याचा विचार करता मालेगाव तालुक्यातील बारा रस्त्यांना प्रमुख जिल्हामार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ही जिल्हा परिषदेकडे असते. परंतु, सदर रस्त्यांचा वाढता वापर लक्षात घेता जिल्हा परिषदेला त्यांच्या विकासासाठी निधी देण्यास मर्यादा पडत होत्या. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारणे अवघड होऊन बसले होते. त्यासाठीच नाशिक जिल्हा परिषदेने सदर रस्ते दर्जोन्नत करण्याचा ठराव शासनाकडे पाठविला होता. शासनाने त्याला मान्यता दिली आहे. मालेगाव तालुक्यातील बारा रस्त्यांना प्रमुख जिल्हामार्ग म्हणून मान्यता मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रमुख जिल्हामार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत २३७ कि.मी.ने वाढ होऊन एकूण लांबी आता ३४६३.८१० कि.मी. इतकी झाली आहे, तर इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची लांबी २५९१.७८० कि.मी. इतकी तर ग्रामीण मार्ग रस्त्यांची लांबी १० हजार ६६२.३५० कि.मी. इतकी असणार आहे.इन्फो
मालेगाव तालुक्यातील बारा रस्त्यांना जिल्हा मार्गाची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 4:31 PM
जिल्हा परिषदेच्या ठरावानुसार दर्जोन्नती
ठळक मुद्देशासनाच्या या निर्णयामुळे या रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.