नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहता, या रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याने अनेक वर्षे प्रमुख मार्गाचे काम रखडल्याने असे रस्त्यांचे जिल्हा मार्गात रूपांतर करून ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात देण्याची होत असलेली मागणी पुर्णत्वास आली असून, सिन्नर तालुक्यातील ६ इतर जिल्हा मार्ग व दोन ग्रामीण मार्गांचा दर्र्जाेन्नत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सुमारे १३३ किलो मीटरचे रस्ते शासनाच्या ताब्यात गेली आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यांची डागडुजी देखील झालेली नाही. यातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यातील असल्यामाुळे त्यांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधीची वाणवा आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना ग्रामीण भागातील नागरिकांच्या रोषास बळी पडावे लागते. त्यामुळे इतर जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांची मालकीच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविण्यात यावी अशी वारंवार मागणी केली जात होती. त्यातूनच जिल्हा परिषदेच्या आमसभेने या संदर्भात ठराव करून तो शासनाकडे पाठविला होता. सदर रस्त्यावर होणारी वाहतुकीची वर्दळ, ज्या गावातून रस्ता जातो तसेच गावांना जोडतो त्या गावांची संख्या, गावातील लोकसंख्या व रस्त्यांचा होणारा वापर याबाबतचा सारा अभ्यास करून जिल्ह्यातील सुमारे १३३ किलो मीटरचे इतर जिल्हा मार्ग व दोन ग्रामीण मार्गांना जिल्हा मार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. यात प्रामुख्याने सिन्नर तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे.चौकट====यामार्गाचा जिल्हा मार्गात समावेश* पास्ते, लोणारवाडी, कुंदेवाडी, मुसळगाव, खंबाळा, मºहळ, निºहाळे ते अहमदनगर जिल्हा हद्द- ३१ किलो मीटर लांबी* डुबेरेपासून पाटोळे, गोंदे, खंबाळा, भोकणी, फर्दापूर, धारणगाव, देवपूर, निमगाव (देवपूर), खडांगळी, मेंढी, सोमठाणे,सांगवी ते इतर जिल्हा मार्ग- ४३ किलो मीटर लांबी* सिन्नर, सरदवाडी, पास्ते, जामगाव, विंचूर दळवी ते राज्यमार्ग- १५ किलो मीटर लांबी* सोनांबे, कोनांबे, धोंडबार, औंधवाडी, आगासखिंड ते प्रमुख राज्यमार्ग- २५ किलो मीटर लांबी* नांदुरश्ािंगोटे, चास, कासारवाडी ते राज्य मार्ग - १६ किलो मीटर लांबी
सिन्नर तालुक्यातील आठ रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा
By श्याम बागुल | Published: September 27, 2018 3:16 PM
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यांची डागडुजी देखील झालेली नाही. यातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यातील
ठळक मुद्देबांधकाम खाते : १३३ किलो मीटर रस्ते शासनाच्या ताब्यातजिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांची मालकीच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे