नाशिक : उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एका शाळेसमोर २७ फेब्रुवारी २०१८ रोजी चाकुने मुख्याध्यापक पत्नीवर तीचा पती संशयित मधुकर खंडू मोरे (वय ७५) याने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना मंगळवारी (दि.२४) मोरे यास जिल्हा सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली. याचा राग येऊन मोरे याने पायतली चप्पल काढून थेट न्यायालयात भिरकावण्याचा प्रयत्न केला; मात्र ही बाब बंदोबस्तावरील पोलिसांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यास पोलिसांनी रोखले. या घटनेमुळे न्यायालयात एकच खळबळ उडाली.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, २०१८साली मुख्याध्यापक पत्नीवर मोरे याने चाकूने वार केले होते. या गुन्ह्यात उपनगर पोलिसांनी त्यास संशयावरून अटक केली होती. जिल्हा न्यायालयात या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करून खटला चालविला जात आहे. याप्रकरणी संशियत मोरे यास मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान सुनावणीसाठी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी युक्तिवाद ऐकून घेत पुराव्यांआधारे त्यास ५ वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचा राग आल्याने मोरे याने पायातली चप्पल काढून ती न्यायाधीशांच्या बाजुने भिरकावण्याच्या प्रयत्न केला असता त्यास पोलिसांनी अटकाव केला. या प्रकाराने न्यायालयात खळबळ उडाली.
जिल्हा सत्र न्यायालय : संशयित आरोपीकडून सुनावणीत चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:54 PM
२०१८साली मुख्याध्यापक पत्नीवर मोरे याने चाकूने वार केले होते. या गुन्ह्यात उपनगर पोलिसांनी त्यास संशयावरून अटक केली होती
ठळक मुद्देबंदोबस्तावरील पोलिसांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यास पोलिसांनी रोखलेपुराव्यांआधारे त्यास ५ वर्षांची शिक्षा सुनावली