निफाड : नाशिक जिल्हा वारकरी महामंडळाची बैठक निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथे झाली. या वेळी जिल्हा वारकरी महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रावण महाराज आहिरे यांचा सत्कार करण्यात आला.नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या जीर्णोध्दार व विकासासाठी भरीव रकमेची तरतूद केल्याची घोषणा केली, त्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्य आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी वारकरी महामंडळाचे जिल्हा सचिव लहू महाराज आहिरे, नाशिक तालुका अध्यक्ष भरत महाराज मिटके, युवा समितीचे जिल्हा संघटक सुदर्शन महाराज शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तू पाटील डुकरे, बाळकृष्ण शास्त्री ठोके, जिल्हा कार्याध्यक्ष हरिश्चंद्र भवर, निफाड तालुकाध्यक्ष विश्वनाथ वाघ, उपाध्यक्ष काशिनाथ व्यवहारे, संघटक सुभाष सोमवंशी, सचिव मधुकर ठोंबरे, खजिनदार साहेबराव रहाणे, संपर्क प्रमुख बंडु धारराव, प्रदिप तिपायले, कोषाध्यक्ष राजाराम मोगल, सदस्य सारंगधर डांगे आदी उपस्थित होते.