नाशिक : एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी व पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकलहरे- हिंगणवेढे शिवरस्ता हा पूर्व पश्चिम सुमारे तीन किलोमिटर आहे. रस्त्याच्या उत्तरेला एकलहरे व गंगापाडळी शिवार तर दक्षिणेला हिंगणवेढे शिवारातील शेती आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुने अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे.दोन वाहने एकाचवेळी पास होत नाहीत. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. सद्या उसतोडीचा हंगाम असल्याने शेतात ट्रक उभे करु न बैलगाडीने उस वाहून आणुन ट्रकमध्ये भरला जातो.या रस्त्याच्या दक्षिणेला एकलहरे व गंगापाडळीचे प्रत्येकी ५० खातेदार आहेत तर दक्षिणेकडे हिंगणवेढेचे सुमारे १०० खातेदार शेतकरी आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजुने कडेला असलेल्या खातेदारांची तलाठ्याकडून माहिती घेऊन, रस्त्याची मोजणी करु न रु ंदीकरण करणे गरजेचे आहे असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने दखल घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सद्या एकलहरेत पूर्णवेळ तलाठी नाही. येथे तलाठ्याची पूर्णवेळ नेमणुक करुन रस्त्याच्या दोन्ही बाजुंच्या खातेदारांची माहिती घेऊन अतिक्र मित भाग काढुन रस्ता रु ंद करावा. येथील शालेय विद्यार्थ्यांना ३ किलोमिटर पायपिट करु न शाळेत जावे लागते. यारस्त्याबाबत त्वरित निर्णय झाला नाही तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.गंगाधर धात्रक, शेतकरी