ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने चालू वर्षातील मागासवर्गीयासाठी १५ टक्के तर दिव्यांगांसाठी ३ टक्के निधीचे वाटप करण्यात आले.येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच सीमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, ग्रामसेवक डी. एस. भोसले, शेखर कर्डीले, भीमसेन साळवे, संजय शिंदे, रामदास भोर आदी उपस्थित होते.सन २०१७-१८ या वर्षातील ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या स्थानिक निधीमधून मागासवर्गीयसाठी कोळीवाडा येथील महादेव कोळी मित्र मंंडळास स्वंयपाकाचे साहित्य देण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टक्के निधी खर्च करण्यात आला. तर दिव्यांगांसाठी असलेल्या तीन टक्के निधीतून पंचवीस हजार रूपये खर्च करण्यात आला असून देविदास ज्ञानदेव शिंदे यांना पाण्याची टाकी तर देविदास रंगनाथ शिंदे, दत्तात्रेय बाळकृष्ण काकड, चित्रा रावसाहेब शिंदे यांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. ग्रामसेवक डी. एस. भोसले यांनी वर्षेभरात खर्च करण्यात आलेल्या रक्कमेचा ताळेबंद सांगितला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशा शिंदे, शोभा शिंदे, सुशिला काकड, काळू गांगड, शंकर जगताप, अरूण शिंदे, मनोज भागवत, अशोक गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग निधीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 5:39 PM