घोटी - इगतपुरी तालुक्यातील आवळी येथून खाजगी कामासाठी साकुर येथे दुचाकीवरून जाणाºया दोघा इसमांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. दरम्यान यात दोघे इसम जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आवळी दुमाला येथील किसन पुंडलिक जमधडे (३७) व ज्ञानेश्वर रामचंद्र जमधडे (३५) हे रविवारी संध्याकाळी मुंढेगाव मार्गे साकुर येथे खासगी कामासाठी दुचाकीवरून जात असताना नांदगाव बु येथील दारणा धरणाच्या परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या दुचाकीवरील इसमावर हल्ला केला.यात दोघेही गंभीर जखमी झाले. या रस्त्यावरून जाणाºया इतर वाहनचालकांना हे जखमी आढळून आल्याने त्यांनी जखमींना जवळच्या मथुराबाई थोरात रु ग्णालयात दाखल केले व त्यानंतर त्यांना नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान गोंदे व अस्वली फाट्यापासून साकुर मार्गे सिन्नरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असून हा रस्ता निर्मनुष्य आण िझाडीचा असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर अधिक आहे.या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान हे दोघे साकुर येथे जात असताना रस्त्यातच त्यांना बिबट्या आडवा झाला ही वस्तुस्थिती असली तरी बिबट्याचा दुचाकीला धक्का लागल्याने हे इसम भयभीत होऊन पडले गेल्याने जखमी झाल्याची माहिती वनविभागाचे ओंकार देशपांडे यांनी दिली.
दुचाकीवरून जाणाºया दोघांवर बिबटयाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:12 PM