नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे , धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेतील तिन्ही सामने जिंकत नाशिकचा जिल्हा क्रिकेट संघाने विभागीय विजेतेपद पटकाविले. जळगाव जिल्हा क्रिकेट संघावर १४६ धावांनी मोठा विजय मिळविला. त्याआधी धुळे व नंदुरबारविरूद्धचे सामनेदेखील नाशिकने जिकले होते.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना करत नाशिकने ४ बाद ५५ वरुन २६१ पर्यंत मजल मारली . रविंद्र मछ्या च्या ८५ धावांमुळे अडीचशेवर मजल मारणे शक्य झाले. त्यानंतर २९ षटकांतच जळगावला ११९ धावत रोखले. गुरवीरसिंग सैनीने ५ तर ऋषिकेश कातकाडेने ४ गडी बाद केले.युवराज पाटील, सतीश गायकवाड , संदीप शिंदे , सुयश बुरकुल यांनी विभागीय संघ निवडला. या यशस्वी कामगिरीबद्दल प्रशिक्षक व व्यवस्थापक शांताराम मेणे ह्यांचेसह १९ वर्षांखालील नाशिकचा जिल्हा क्रिकेट चमुचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी त्यांचा सत्कार केला.
संक्षिप्त धावफलक :
नाशिक ५० षटकांत सर्वबाद २६१ - रविंद्र मछ्या ८५, मुस्तांसिर कांचवाला ४५ व गुरवीरसिंग सैनी ४१ विजयी वि. जळगाव सर्वबाद ११९ - नचिकेत ठाकूर नाबाद ३३, गुरवीरसिंग सैनी ५ व ऋषिकेश कातकाडे ४ बळी. नाशिक १४६ धावांनी विजयी.
इन्फो
विभागीय संघ निवड
या दमदार कामगिरीमुळे नाशिकच्या गुरवीरसिंग सैनीची विभागीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असुन नाशिकच्या एकुण सात खेळाडुंचा विभागीय संघात समावेश करण्यात आला आहे तर दोघे राखीव खेळाडु असतील.
विभागीय संघ : गुरवीरसिंग सैनी ( कर्णधार ), ओम घाडगे, स्वप्नील शिंदे, शर्विन किसवे, मुस्तांसिर कांचवाला, रविंद्र मछ्या, ऋषिकेश कातकाडे तर राखीवमध्ये नाशिकच्या अभिषेक जंगम व रितेश तिडके यांचा समावेश आहे.
फोटो
०६क्रिकेट