पेठ - तालुक्यातील घोटविहीरा व उंबरमाळ भागात डोंगराला पडलेल्या भेगामुळे घाबरलेल्या जनतेची विभागीय आयुक्त राजाराम माने व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट घेऊन पाहणी केली. तसेच स्थलांतरीत नागरिकांशी चर्चा करून दिलासा दिला.तालुक्यात गत सप्ताहात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रारंभी निरगुडे येथे जमिनीतून निघालेल्या बुड बुडयामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पाठोपाठ घोटविहीरा येथे डोंगरास उभी भेग पडल्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उंबरमाळ या वस्तीला धोका संभवणार असल्याची शक्यता ध्यानी घेऊन प्रशासनाने रातोरात नागरिकांचे स्थलांतर नजिकच्या करंजपाडा गावात करण्यात आले. तर दोन दिवसाच्या अंतराने लिंगवणे गावाच्या शिवारात जमीन खचल्याचा प्रकार घडल्याने भुकंप होइल या भयाने तालुकावासीयांना पछाडल्याने प्रशासनही हतबल झाले होते. या पाशर््वभूमिवर शासनाने गांभीर्या ने दखल घेऊन भूगर्भीय हलचालीचा सुक्ष्म अभ्यास करणारी या संस्थेचे तांत्रीक अधिकारी बेडवाल यांच्यासह विभागीय आयुक्त राजाराम माने , जिल्हाधिकारी सुरज मांढरे, प्रांतधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली. अतिवृष्टीने डोंगरात पाणी मुरल्याने तसेच रस्ता बनवितांना डोंगरमध्यावर कापला जात असल्याने डोंगरातील पोकळभागात पाणी मुरत असल्याने असे प्रकार उदभवत असल्याचे मत नोंदविण्यात आले असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पेठचे तहसिलदार हरीश भामरे, व हरसुलचे पोलीस निरिक्षक शिवाजी बढे या दोघा अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास स्वत: गावात तळ ठोकून उंबरमाळच्या ग्रामस्थांना रात्रीतून करंजपाडा येथे हलवले. याबद्दल वरिष्ठांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी विनोद मेढे, विनधकारी ठोंबल , मंडळ अघिकारी गोतरणे , तलाठी उत्तम चेबाळे , पोलीस पाटिल यशवंत चौधरी, सुभाष चौधरी ,ग्रामसेवक पाचोरे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांची घोटविहीर गावाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 2:31 PM